सोने झाले स्वस्त अन् चांदी महागली

सोने आणि चांदीसाठी हा आठवडा स्वस्त-महागाईचा राहिला. आठवडय़ाभरात सोने 919 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी 201 रुपयांनी महाग झाली आहे. 8 ऑगस्टला सोन्याचा भाव 1 लाख 942 रुपये प्रति तोळा होता, तो 14 ऑगस्टला 1 लाख 23 रुपये प्रति तोळय़ापर्यंत खाली आला, तर चांदी 8 ऑगस्टला 1 लाख 14 हजार 732 रुपये प्रति किलो होती. 14 ऑगस्टला 1 लाख 14 हजार 933 रुपये किलो झाली. 22 पॅरेट सोन्याची किंमतसुद्धा 91 हजार 621 रुपये तोळा झाली आहे.