दुबईस्थित कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्यांना अटक

आमची दुबई स्थित कंपनी असून जर आपण कंपनीत गुंतवणुक केल्यास आपल्याला त्या गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्क्यांनी परतावा  आणि त्याच किंमतीचे शेअर्स मिळतील असे सांगत पश्चिम उपनगरातील एका व्यावसायिकाला सायबर भामटय़ांनी पाच कोटी 24 लाखांचा गंडा घातला होता. या प्रकरणी चौघा आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पश्चिम उपनगरातील त्या व्यावसायिकाला संपर्क साधला आणि आमची दुबई स्थित कंपनी असून कंपनीच्या उत्तम स्किम आहेत. त्यात जर तुम्ही गुंतवणुक केली दहा टक्क्यांनी परतावा मिळेल असे सांगितले. या भुलथापांना बळी पडत व्यावसायिकाने आरोपींनी दिलेल्या बॅक खात्यात पाच कोटी 24 लाख वळते केले. पण सदरचे बॅक खाते वैयक्तिक स्वरूपाचे असल्याचे तसेच आपण गुंतवणुक केली अशी दुबई स्थित कुठली कंपनीचं नसल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली.