
देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनातून या भेटीचे पह्टो शेअर करण्यात आले आहेत. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सध्या राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिकारांच्या संदर्भातील सुनावणी सुरू असताना झालेल्या या भेटीला महत्त्व आहे.