
खामगांव अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदुरा येथे धाड टाकून अवैध शस्त्रविक्री करणारा आरोपी जेरबंद करण्यात आला.
शेख वसीम शेख सलीम (33, रा. शाहीण कॉलनी, नांदुरा) याच्या ताब्यातून तब्बल 41 धारदार तलवारी, पल्सर मोटारसायकल व मोबाईल असा एकूण 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोटारसायकलवरून धारदार तलवारी विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. तलवारींवर “सिरोही की सुप्रसिद्ध तलवार 100 साल वारंटी” असे कोरलेले होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीआय श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात स.पो.नि. सचिन पाटील, पो.उप.नि. अविनाश जायभाये यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने केली. सध्या आरोपीविरुद्ध पुढील गुन्हेगारी कारवाई सुरू आहे.