शिवसेनेचा मदतीचा हात

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुर्ला क्रांती नगर, संदेश नगर, पारीख खाडी वसाहतीतील रहिवाशांना महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालिना विधानसभा संघटक अॅड. सुधीर खातू यांच्या वतीने या रहिवाशांना जेवण, पुलाव, बिस्किटांचे याचे वाटप करण्यात आले. घरोघरी जाऊनही नागरिकांना मदत करण्यात आली.

मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हजारो प्रवासी खोळंबले. त्या प्रवाशांसाठी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. मोटरमन विकास पाटील, शैलेश कांबळे, अभय वर्तक, नीलेश भानुशाली, पृष्णा रणशूर, हिरेन अंजारा, राजेश भगत, शिव वर्मा व इतर शिवसैनिकांनी मदतकार्यात सहभाग घेतला. यावेळी मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाचे वाणिज्य प्रबंधक प्रविंद्र वंजारी हे उपस्थित होते.