पालिकेच्या महोत्सवात मोदक घरपोच मिळवा

गणेशोत्सवासाठी पालिका संचालित महिला बचत गटांकडून ‘मोदक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत  https://shgeshop.com  या संकेतस्थळावर  मुंबईकर मोदकासाठी नोंदणी करू शकणार असल्याची माहिती संचालक (नियोजन) प्राची जांभेकर यांनी दिली. महिला बचत गटांना नावीन्यपूर्ण व व्यवसायाभिमुख उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. याअंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार गणेशोत्सवात पालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी 21 ते 25 ऑगस्ट या कालावधीत मोदक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.