भाजपने मिंधेना वॉशिंग मशीनमध्ये धुतलं आणि मिंधेंनी मुंबईची तिजोरी धुतली! आदित्य ठाकरे यांची खोचक टीका

मुंबईतील वाकोला पुलावरील खड्ड्यांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली असून त्यांनी आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत याबाबत चर्चा केली असल्याचे समजते. त्यावरून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप व मिंध्यांवर जोरदार टीका केली आहे.

”फेकनाथ मिंधे यांच्या भ्रष्ट कारभाराने आज मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही! वाकोला पुलावरील खड्डे, याबाबत आमचे आमदार वरुण सरदेसाई यांनी व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला होता. दोन वर्ष मी सातत्याने सांगतोय की पाच कंत्राटदारांना हाताशी घेऊन मिंधेनी स्वतःचे खिसे भरले आणि अजून खड्डे करुन ठेवले. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना फोन केल्याची बातमी आहे. एकच गम्मत… या भ्रष्ट कारभाराला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा गेली दोन वर्ष होता. मिंधेना वॉशिंग मशीन मधे त्यांनीच धुतलं आणि मिंधेंनी मुंबईची तिजोरी धुतली!”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मिंधे गट व भाजपला लगावला आहे.

वरुण सरदेसाईंनी शेअर केलेला पुलाचा व्हिडीओ –