
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर टिका केली म्हणून त्यांच्या घरावर एफबीआयने छापा टाकल्याचे वृत्त आहे. गेल्या शुक्रवारी अलास्कामधील अँकोरेज येथे ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील शिखर परिषदेच्या एक दिवस आधी बोल्टन यांनी टॅरिफ धोरणावर टीका केली होती.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोल्टन यांनी ट्रम्प यांना अविवेकी राष्ट्राध्यक्ष आणि हिंदुस्थआन- अमेरिका संबंध खूप वाईट स्थितीत असल्याचे म्हटले होते.त्यांनी अमेरिकेच्या हिंदुस्थानबद्दलच्या गोंधळलेल्या दृष्टीकोनावर टीका केली आणि रशियन तेल खरेदी केल्याबद्दल हिंदुस्थानवर दंड म्हणून 25 टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, 17 महिने ट्रम्प यांचे तिसरे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम कणारे जॉन बोल्टन यांचे इराण, अफगाणिस्तान आमि उत्तर कोरिया यांसारख्या मुद्यांवर तत्कालीन राष्ट्राध्यक्षांशी वारंवार वाद होत होते.