
तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुह्यातील एका आरोपीला अखेर मलबार हिल पोलिसांनी अटक केली. प्रेमपाल वाल्मीकी असे आरोपीचे नाव असून वर्ष 2006 पासून तो आपला ठावठिकाणा लपवून राहत होता.
नवी दिल्लीतील अर्पेशनगर परिसरात मलबार हिल पोलिसांच्या पथकाने परिसरात पाळत ठेवून स्थानिक रहिवाशांकडून आरोपीची माहिती गोळा केली आणि तांत्रिक बाबींच्या आधारे प्रेमपालला पकडले. वीस वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो लपून राहत होता.