बिहारमध्ये मतं चोरण्यासाठी SIR प्रक्रिया राबवण्यात आली, राहुल गांधी यांचा आरोप

निवडणूक आयोग आणि भाजपची युती आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच बिहारमध्ये मतं चोरण्यासाठी SIR प्रक्रिया राबवण्यात आली असेही राहुल गांधी म्हणाले.

बिहारमध्ये मतदार यात्रेनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग बिल्कुल तटस्थ नाही. निवडणूक आयोग आणि भाजपची युती आहे. जर निवडणूक आयोग तटस्थ असता तर आयोगाने भाजप नेते अनुराग ठाकूर यांना नोटीस पाठवली असती. तसेच बिहारमध्ये मतं चोरण्यासाठी SIR प्रक्रिया राबवण्यात आली.

तसेच यात्रा अत्यंत यशस्वी झाली आहे आणि लोक मनापासून आमच्याशी जोडले जात आहे. आम्ही मतांची चोरी याबद्दल जे म्हटले होते, ते बिहारमधील लोक स्वीकारत आहेत हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाचे काम योग्य मतदार यादी उपलब्ध करून देणे आहे. पण महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये ते करण्यात तो अपयशी ठरले आहे. आमचा संपूर्ण दबाव निवडणूक आयोगाच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यावर आहे आणि आम्ही थांबणार नाही. बिहारमध्ये मतांची चोरी होऊ देणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.