
महाराष्ट्रातील जनतेने वराह जयंती साजरी करावी असे निर्देश भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राणेंच्या चेहऱ्याला वराहाचे चित्र रेखाटून विडंबनात्मक वराह जयंती साजरी केली. यावेळी आंदोलकांनी आधुनिक राजकारणातील एक वराह म्हणजे नितेश राणे आहे म्हणून त्यांची अशा प्रकारे जयंती साजरी केली असे स्पष्टीकरण दिले.
आमदार नितेश राणे यांना जनतेने चांगले कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. परंतु ते वारंवार शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका करत असतात. सत्तेत असून सुद्धा धर्माधर्मांमध्ये, जाती जातीमध्ये तेढ लावतात. पालकमंत्री असून कणकवली मध्ये मटक्यावरती रेड घालण्यापेक्षा ज्यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांना विचारा कुणाच्या आदेशाने मटका, दारू धंदे सुरू आहेत असे प्रितिक्रिया उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, दीपक दळवी, आबा सावंत, मनोज कामेगावकर, सुरेश जगताप, उज्वल दीक्षित चव्हाण, अजय माळगे, शंकर सोलंकर, महेश गवळी, मीनाक्षी गवळी, सोनल भोसले, विजय पुकाळे, लहू गायकवाड, ऋषी दोरकर, विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड, दत्ता खलाटे, आसिफ मुल्ला, नाना कळसकर आदी उपस्थित होते.