निवडणूक आयोग गुजरातमधल्या त्या अज्ञात राजकीय पक्षांची चौकशी करणार का? राहुल गांधी यांचा सवाल

गुजरातमध्ये काही राजकीय पक्षांनी निवडणूक खर्च काही लाखांत दाखवला आहे. पण ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी हाच खर्च हजारो कोटी रुपयांमध्ये दाखवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग याची चौकशी करणार का असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. तसेच यासाठीही आता आयोग प्रतिज्ञापत्र मागणार का असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.

एक्सवर दै. भास्करची एक बातमी पोस्ट करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, गुजरातमध्ये असे काही अज्ञात राजकीय पक्ष आहेत, ज्यांचं नावं कुणीी ऐकलीही नाहीत. पण त्यांना तब्बल 4300 कोटींची देणगी मिळाल्या आहेत. या पक्षांनी फारच कमी वेळा निवडणुका लढवल्या आहेत, किंवा त्यावर खर्च केला आहेत. त्यांना हे हजारो कोटी रुपये कुठून मिळाले? हे पक्ष चालवतं कोण? आणि पैसा गेला कुठे? निवडणूक आयोग याची चौकशी करणार का ? की इथेही आधी प्रतिज्ञापत्र मागणार? की मग थेट कायदाच बदलून टाकेल, जेणेकरून हा डेटा सुद्धा लपवता येईल? असेही राहुल गांधी म्हणाले.