महाराष्ट्रात आणि हरयाणात निवडणूक कशी चोरली हे पुराव्यानिशी दाखवणार, राहुल गांधी यांची घोषणा

मतं चोरण्याचे हे गुजरात मॉडेल आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रात आणि हरयाणात निवडणुका कशा चोरल्या हे आम्ही पुराव्यासह दाखवू असी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

बिहारमध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ही ‘मतं चोरी’ गुजरातमध्ये 2014 च्या आधीपासूनच सुरू झाली. आणि 2014 मध्ये त्यांनी ती देश पातळीवर आणली. गुजरात मॉडेल म्हणजे आर्थिक मॉडेल नाही; हे मॉडेल ‘मतं चोरी’चं मॉडेल आहे. भाजपने मध्यप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या. आम्ही काही बोललो नाही कारण आमच्याकडे पुरावा नव्हता. पण महाराष्ट्रात त्यांनी अती केलं आणि आम्हाला पुरावा मिळाला. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात तब्बल 1 कोटी मतं वाढवली आणि ती सगळी भाजपाकडे गेली. हरियाणा, महाराष्ट्र आणि लोकसभा निवडणुका कशा चोरल्या गेल्या ते आम्ही पुराव्यासह दाखवू असेही राहुल गांधी म्हणाले.