
आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह मतदार हक्क यात्रेमध्ये सामील झाले. यावेळी त्यांना भाजपवर मतचोरीवरून टीका केली. मतदारांना यादीतून वगळणे दहशतवादापेक्षाही धोकादायक, असं ते म्हणाले आहेत.
एम.के. स्टॅलिन म्हणाले आहेत की, जनतेच्या कल्याणासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. ही मैत्री आता बिहार निवडणुकीत आम्हाला विजय मिळवून देईल. भाजपचे विश्वासघातकी राजकारण हरणार आहे. निवडणुकीपूर्वी तुमचा विजय निश्चित आहे, म्हणून ते हा विजय थांबवू इच्छितात. जर मतदान निष्पक्ष आणि योग्य झालं तर, भाजप हरेल, म्हणूनच ते घाबरले आहेत.
निवडणूक आयोगावर टीका करत ते म्हणाले, “या लोकांनी निवडणूक आयोगाला त्यांचे कठपुतळी बनवले आहे. बिहारमधील 65 लाख लोकांना मतदार यादीतून काढून टाकण्यात आले आहे. मतदार यादीतून काढून टाकणे हे दहशतवादाहूनही धोकादायक आहे. राहुल गांधीजींच्या शब्दात आणि डोळ्यात कधीही भीती नसते. ते फक्त राजकारण आणि रंगमंचासाठी बोलत नाहीत.”