
शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 706 अंकांनी म्हणजेच 0.87 टक्क्यांनी कोसळून 80,080.57वर पोहोचला. रशियाकडून तेलखरेदी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेल्या 25 टक्के अतिरिक्त टॅरिफमुळे शेअर बाजारात अक्षरशः भूकंप आला.
गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर पैसा बाजारातून काढून घेतला. तसेच शेअर्सची मोठय़ा प्रमाणावर विक्री झाल्याने शेअर बाजार गडगडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 211.15 अंकांनी म्हणजेच 0.85 टक्क्यांनी घसरून 24,500.90वर स्थिरावला.