
वायुदलातील फायटल जेटची संख्या वाढवण्यासाठी आणखी एका प्रस्तावावर विचार सुरू आहे. सध्या विकसित होत असलेल्या नेव्हल फायटर जेटचे एअरफोर्स वेरिएंट तयार केले जाईल. हा विचार आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेल तसेच स्वदेशी निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.
सरकारच्या मालकीची एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) नौदलासाठी ट्विन इंजिन डेस्क बेस्ट फायटर जेट डिझाईन करत आहे. साधारण 150 पेक्षा जास्त विमाने तयार केली जाणार आहेत. त्यासाठी 13 ते 14 हजार कोटी रुपये खर्च होईल, असा अंदाज आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होणारा खर्च पाहता नौदल आणि वायुदलासाठी वेगवेगळे वर्जन करण्याचा विचार पुढे येतोय. योजनेनुसार, नेवल फायटर 26 टन वजनी असतील, तर असे एअरफोर्स वेरियंट विकसित केले जातील, जे यापेक्षा कमी वजनाचे असतील. अशा पद्धतीने दोन्ही मिळून 150 विमानांची निर्मिती झाली तर प्रत्येक विमानाच्या निर्मितीचा खर्च कमी होईल.