मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, कोकणातही लागणार पावसाची हजेरी

मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज मराठवाड्यात 30 ते 40 ताशी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.