
नागपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाला पक्षाने धडक दिल्याने विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात 272 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप उतरवण्यात आले. अपघाताचा तपास करत आहे, असे वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांनी सांगितले.
इंडिगोचे विमान 6E812 हे नागपूरहून कोलकात्याला चालले होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने पक्षी विमानाला धडकला. पक्षी धडकल्यानंतर विमानाचे संतुलन बिघडले आणि प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. क्रू मेंबर्सकडून प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. पायलटने प्रसंगावधान राखत नागपूर विमानतळावर विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवण्यात आले.