
गणेशोत्सवात बाप्पाच्या सेवेचे किंवा भक्तिभावाचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले दिसून आले. यामध्ये नृत्याच्या व्हिडीओचे प्रमाण जरा जास्तच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गणेशभक्तांचे गावखेडय़ातील पारंपरिक नाचाचे तसेच त्यांच्या भजन-कीर्तनाच्या व्हिडीओंना नेटिजन्सचा चांगला प्रतिसाद मिळतोय. असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात तीन महिला गणपतीसमोर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तिघीजणी घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ‘सरला श्रावण भादवा आला’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱयावरचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ यूटय़ूबवरील @aditi_kathavale या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.