कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? टोळीयुद्धावरून रोहित पवार यांचा सवाल

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर उफाळून आले आहे. यात एका व्यक्तीचा खून झाला आहे. त्यावरून नव्या पुण्याचे शिल्पकार’? कुठे आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वांत मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो… एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टीच्चून पुण्यात रक्तरंजित होळी खेळली जाते.. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय… अशा परिस्थितीत लोक विचारतायेत कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? असे रोहित पवार म्हणाले.