दोन लग्न लपवून तिसरीला जाळ्यात अडकवले, पुणेरी नवरोबाला हायकोर्टाचा दणका; जामीन फेटाळला

दोन वेळा विवाह होऊनही लग्नाचे आमिश दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱया नवरदेवाला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती आर. एन. बोरकर यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला. त्यावर याचिकाकर्त्यांनी सदर जामीन अर्ज मागे घेतला.

दोनवेळा विवाह केला असतानाही तिसऱयांदा लग्नाचे आमिश दाखवून होणाऱया जोडिदारावर लैंगिक अत्याचार करणाऱया नवरदेवा विरोधात पुण्याच्या विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जामिनासाठी आरोपीने पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली मात्र पुणे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामिन अर्ज फेटाळून लावला त्यानंतर त्याने अॅड. सत्यव्रत जोशी यांच्या मार्फत हायकोर्टात अर्ज दाखल केला त्या अर्जावर न्यायमूर्ती आर. एन. बोरकर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी फिर्यादीच्या वतीने अॅड विवेक आरोटे तर राज्यसरकारच्या वतीने अॅड बि. व्ही. होळंबे पाटील यांनी युक्तीवाद करत या जामिन अर्जाला जोरदार विरोध केला न्यायालय जामिन देण्यास नकार देणार असल्याचे लक्षात येताच याचिकाकर्त्यांनी सदर याचिका मागे घेत असल्याचे सांगितले.