तुम्ही मागत रहा, आम्ही देत राहतो; ओबीसी आरक्षणाला धक्का नाहीच, फडणवीसांचे आश्वासन

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, सर्व समाजांनी मागत रहावे, आम्ही देत राहतो, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी बांधवांना दिले. ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे अभिवचनही त्यांनी दिले.

पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही असे सांगतानाच कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच प्रमाणपत्र दिले जातील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. हैदराबाद गॅझेट हे प्रमाण मानून कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.