
नगरमध्ये एका पती पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या वादातच पतीने पत्नीचा खून केला आणि आत्महत्या केली. पत्नीचे नाव वैष्णवी खांबेकर असून पतीचे नाव कुलदीप अडांगळे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी वैष्णवी आणि कुलदीप यांचा प्रेमविवाह झाला होता. धक्कादायक म्हणजे संजयची आधी दोन लग्न झाली होती. संजयचे हे तिसरे लग्न होते. कुलदीप आणि वैष्णवीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संजयने रागाच्या भरात पत्नीचा खून केला आणि आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसळात एकच खळबळ उडाली आहे.
कुलदीपचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कुलदीप सुनील अडांगळे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तर वैष्णवी संजय खांडेकर हिचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी लोणी प्रवरानगर येथे पाठवण्यात आला होता. याबाबत शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. तर वैष्णवी हिच्यावर संगमनेर येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात आले.
 
             
		




































 
     
    





















