
खंडाळा येथील सिताराम वीरच्या खूनात संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या मित्रांना मदत तसेच त्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयातून जयगड पोलिसांनी दुर्वासचे वडिल दर्शन पाटील यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सीताराम वीर खून प्रकरणाचा तपास करताना जयगड पोलिसांना त्याच्या खूनात दुर्वासचे वडिल दर्शन पाटील यांचाही सहभाग तसेच या गुन्ह्यात संशयितांना मदत केल्याचा संशय आला. त्यावरुन जयगड पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.



















































