
आगीचा भडका तसेच धोकादायक इमारतींमध्ये अडकलेल्या पनवेलमधील रहिवाशांना आता वाचवणे सोपे होणार आहे. यासाठी पनवेलच्या अग्निशमन दलात लवकरच चार बम्ब आणि उंच शिडी दाखल होणार आहे. ही सीडी 55 मीटर असणार आहे. त्यामुळे एखाद्या दुर्घटनेनंतर बचावकार्य करताना अग्निशमन जवानांची होणारी कसरत थांबणार आहे.
पनवेल पालिकेच्या स्थापनेपूर्वी येथे एकच अग्निशमन केंद्र होते. नंतर सिडको वसाहतींचे हस्तांतरण पालिकेकडे झाल्यानंतर नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रही पालि केकडे आले. सद्यस्थितीत पालिकेकडे तीन केंद्रे असून 135 कर्मचारी अग्निशमन यंत्रणेच्या कार्यासाठी तैनात आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या कामांमुळे कामोठे, कळंबोली, तळोजा, रोहिंजन, घोटगाव, नावडे आणि खारघर परिसरात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. यामुळे भविष्यात आगप्रतिबंधक यंत्रणांची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे. याकरिता खांदेश्वर स्थानकाजवळ नवीन केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच सिडकोने उभारलेली नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रे सुमारे 40 वर्षे जुनी आहेत. या केंद्रांच्या इमारत जीर्ण झाल्याने नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पनवेल परिसरात अनेक मोठे गृहप्रकल्प उभारले जात असून लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. पालिका आयुक्त मंगेश चितळे आणि उपायुक्त कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठ्यात ल वकरच नवीन अद्ययावत अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. तसेच तळोजा घोट परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याचा पालिकेचा मनोदय आहे. प्रवीण बोडके, मुख्य अग्निशमन अधिकारी, पनवेल महापालिका