परीक्षण – कामगार संस्कृतीच्यय जीवनाचा वेध

>> श्रीकांत आंब्रे

अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीच्या गिरणगावातील चाळ संस्कृतीचे, ऐतिहासिक गिरणी संपानंतर उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगार विश्वाचे आणि त्यानंतर तिथे झालेल्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे यथार्थ चित्रण शांताराम पंदेरे यांच्या ‘आऱ्या’ या आत्मकथनात पाहायला मिळते.

वाचनाची गोडी असलेल्या बुद्धिमान आणि अभ्यासात हुशार असलेल्या एका गिरणी कामगाराच्या मुलाने शाळकरी वयापासून कालेज जीवनापर्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या आठवणींचे पडसाद या आत्मकथनात उत्कटतेने उमटलेले दिसतात. त्या वेळी नायगावच्या कोहिनूर मिलमध्ये कपडाखात्यात त्याचे वारकरी संप्रदायाचे भक्त असलेले वडील काम करत होते. गिरणीच्या चाळकरी वसातीत कुटुंबास रात होते. कालेज जीवनानंतर मुंबई सोडून गेलेल्या शांताराम यांनी इतक्या वर्षांनंतर आत्मकथनाद्वारे या आठवणींना उजाळा दिला आहे. अपेक्षित नसलेल्या एका नव्याच संस्कृतीचा जन्म होताना अंतर्मनात चाललेल्या विचारांच्या घुसळणीला त्यांनी या आत्मकथनाद्वारे मोकळी वाट करून दिली आणि त्यातून ‘आऱ्या’ या आत्मकथनाचा जन्म झाला.

गेल्या अठावन्न वर्षांतील बदलत गेलेल्या मुंबईचे चित्र लेखक या आत्मकथनातून उभे करतो. गिरणगावाने तीन पिढय़ांचे आयुष्य घडवले हे सांगताना चाळ संस्कृतीतील शेजारधर्म आणि जिव्हाळा, गिरणगाव परिसरात दैनंदिन जीवन जगताना नेमीच डोळय़ांसमोर दिसणारी दृश्ये, चाळकऱ्यांची सुखदुःखे, बैठकीच्या खोल्या, नेमीचे सण, उत्सव, खेळ, पानाची गादी, कुल्फी यांसारखी अनेक वैशिष्टय़े त्याच्या मनात घर करून रातात. ‘युक्रांद’च्या पार्श्वभूमीवर समतेचा वसा घेतलेल्या या लेखकावर थोर पुरुषांचे संस्कार आहेत. मात्र चळवळीत झोकून न देता तो अलिप्तपणे आजूबाजूच्या घटनांचा डोळसपणे विचार करतो. त्यांची संगती लावत काही निष्कर्षाप्रत येतो.

बदलाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत साम्यवादी पक्षांची झालेली पीछेहाट, आमदार कृष्णा देसाई यांचा खून, शिवसेनेच्या उदयानंतर तरुणांमध्ये जागृत झालेली विधायक समाजकार्याची लाट, गँगवार संस्कृतीचे राडा संस्कृतीत झालेले रुपांतर, खंडणीखोर टोळय़ांकडून होणाऱ्या खुलेआम त्या, त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ, डा. दत्ता सामंत यांच्या त्येनंतर धुगधुगत असलेल्या कामगार चळवळीचा झालेला अस्त, बिल्डर, राजकारणी, सत्ताधारी, बडे दलाल, कंत्राटदार, उद्योगपती आणि अंडरवर्ल्डने घशात घातलेल्या केवळ लुटीच्या नफेखोरीने वखवखलेले मुंबईचे भेसूर रूप त्याला दिसते. मोबाईल संस्कृतीनंतर आानलाइन बँकिंग सेवेने केलेली क्रांती, एआय आभासी तंत्रज्ञानाने केलेली किमया, गिरण्या आणि चाळींच्या जागेवर उभी रात असलेली टावर संस्कृती हा बदल म्हणजे माणसाला निर्बुद्ध करणाऱ्या विकसित तंत्रज्ञानाचे फसवे रूप त्याला वाटते. जोवर नवी पिढी न्यायावर आधारित ‘जग बदलण्याची भाषा’  करणार नाही, तोवर तिला खरेखुरे मानवीय जीवन जगायला मिळेल असे वाटत नाही. त्यांच्याही जीवनाचा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ‘आऱ्या’ कधी होईल हे समजणारही नाही, असे त्याला वाटते.

नायगाव हा या आत्मकथनाचा केंद्रबिंदू असला तरी मुंबईच्या कुठल्याही विभागातील चाळकऱ्यांना ही आपल्याच जीवनाची कहाणी वाटेल. नायगावच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या त्याच्या आठवणी हासुद्धा एक दुर्मिळ ठेवा आहे. लेखकाचे वर्गशिक्षक कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून त्यांना झालेली कामगार वर्गाच्या शोषणाची जाणीव, अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतेया काहिली’ या गीतरचनेतून उमगलेली विवाहित गिरणी कामगार तरुणांच्या तबलतेची व्यथा यातून त्यांच्यातील सहृदय माणूस घडत गेला. त्यांचे मोजके मित्र, चाळीतील काही व्यक्ती आणि वल्ली यांचे स्वभावविशेष सांगताना त्यांच्या लेखणीला बर येतो. साध्या, सोप्या भाषेतील हे आत्मकथन एखाद्या कादंबरीइतकेच उत्कंठामय तसेच उद्बोधक आणि विचार प्रवर्तक आहे. सरदार जाधव यांचे विषयाला साजेसे मुखपृष्ठही वेधक आहे.

आऱ्या (आत्मकथन)

 लेखक : शांताराम पंदेरे

 प्रकाशक : लोकवाङ्मय गृह, प्रभादेवी

 पृष्ठे : 220,  मूल्य रुपये : 250/-