विरार-दादरच्या लेडीज डब्यात विकृत तरुणाची घुसखोरी,महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच

विरारहून दादरच्या दिशेने सुटलेल्या  लोकलमधील लेडीज डब्यात एका विपृत तरुणाने घुसखोरी करत धुमापूळ घातला. लेडीज डब्यातील दरवाजाला लटकत त्याने अश्लील शेरेबाजी केली. डब्यावर जोरजोरात हात आपटत धुडगूस घातला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वसई लोहमार्ग पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.

11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता विरार-दादर लोकल मुंबईच्या दिशेने निघाली. या लोकलने मीरा रोड स्थानक सोडल्यानंतर माल डब्यात चढलेल्या तरुणाने शेजारच्या लेडीज डब्यातील खिडकीतून डोकावून अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली. त्याच्या या चाळ्यामुळे खिडकीजवळ बसलेल्या तरुणी घाबरल्या. या विपृताने डब्याच्या पत्र्यावर जोरजोरात बुक्के मारले. तो अचकटविचकट भाषेत अश्लील शेरेबाजीही करीत होता. यामुळे महिलांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

‘विरार मेरी जान’वरील व्हिडीओची दखल

‘विरार मेरी जान’ या फेसबुक, इन्स्टाग्राम आयडीवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला. या अकाऊंटच्या अॅडमिननेही त्या विपृत तरुणाची पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली. हा इसम मनोरुग्ण असल्याचे वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली.

रेल्वे हेल्पलाईनकडून मदत मिळालीच नाही

याच डब्यातून प्रवास करणाऱया विरारमधील स्वरा भोसले (32) या महिलेने हिंमत करून त्याच्या विपृत चाळ्यांचा व्हिडीओ शूट केला. त्यांनी रेल्वे हेल्पलाईनलाही पह्न केला. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. या विपृताचे हे चाळे अंधेरी स्थानक येईपर्यंत सुरू होते.