
हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धाराशिव जिह्यात एका तरुणाने आत्महत्या केली. पवन चव्हाण या तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून, त्यात बंजारा समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
नाईकनगर येथील पवन चव्हाण हा बंजारा समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, यासाठी आग्रही होता. अलडकडेच बंजारा समाजाने परभणी जिल्हय़ात जिंतूर येथे गोर समाजाचे अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातही तो हिरीरीने सहभागी झाला होता. शनिवारी तो जिंतूरला आंदोलनासाठी जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पवनने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.