
येत्या गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळावासीय ‘ड्राय डे’ पाळणार आहेत. कारण या दिवशी या शहरांमध्ये चोवीस तास पाणीकपात करण्यात येणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि बारवी पंपिंग स्टेशनमध्ये महत्त्वाची तांत्रिक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने ही पाणीकपात होणार असून बुधवारीच योग्य पाणीसाठा करून ठेवा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळावासीयांना अखंड आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा यासाठी जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि बारवी पंपिंग स्टेशनमध्ये महत्त्वाच्या तांत्रिक दुरुस्त्या एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते शुक्रवार १९ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
डोंबिवली, तळोजा एमआयडीसीलाही त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली आणि झळ बसणार उल्हासनगरच्या परिसरातील ग्रामपंचायतींनाही या पाणीकपातीची झळ डोंबिवली आणि तळोजा एमआयडीसीलाही बसणार आहे. हा ‘ड्राय डे’ सोसावा लागणार आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार असला तरी शनिवारी २० सप्टेंबरपर्यंत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याचे एमआयडीसीच्या सूत्रांनी सांगितले.