
जीएसटीमुळे महाराष्ट्रातून 20 लाख रुपयांची पाकीटमारी झाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच यासाठी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
जीएसटी माफ केला म्हणून वाहनांच्या शोरुममध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो लावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यावर एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा GST वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीटमारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी तळटीपही फोटोखाली देणार आहात का? GST मुळं सर्वांत मोठी पाकीटमारी (20 लाख कोटी) तर महाराष्ट्रात झाली, मग महाराष्ट्रात तर प्रत्येक घरात ही तळटीप असलेले फोटोच लावावे लागतील.
कदाचित हे फोटो लावण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कल्पनाही नसेल पण नेत्यांना खूष करण्यासाठी आजूबाजूचे काही नेते अशा करामती करतात असेही रोहित पवार म्हणाले.
मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा #GST वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीटमारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी #तळटीपही फोटोखाली देणार आहात का? GST मुळं सर्वांत मोठी पाकीटमारी (२० लाख कोटी) तर महाराष्ट्रात झाली, मग महाराष्ट्रात तर… pic.twitter.com/0PKelXDbX5
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 14, 2025