
सोलापूरमध्ये जुना पुना नाका पुलावरील नाल्यात रिक्षाचालक रिक्षासह वाहून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी रिक्षाचलकाचा शोध घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपत्कालीन व्यवस्थेसाठी मागणी केली आहे.
सोलापूर महानगरपालिका हद्दीतील जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलामध्ये मागील दोन ते चार दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे रौद्ररूप धारण केले आहे. रविवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास सतीश सुनील शिंदे हे रिक्षाने घराकडे जात असताना जुना पुना का स्मशानभूमीकडील पाण्याचा प्रवाहामध्ये रिक्षसह वाहत गेल्याची माहिती मिळाली. यावेळी राष्ट्रवादी आनंद चंदनशिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथील परिस्थितीची माहिती घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना घटनेची माहिती दिली. व घटनास्थळावर तातडीने योग्य ते उपाय योजना करण्याचे मागणी केली.