
केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण दर महिन्याला बदलत असतं असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी भाजपचे नेते म्हणत होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, आणि आज तेच म्हणत आहेत की आपण पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू. त्यांचे धोरण दर महिन्याला बदलतं आणि यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे, हे जगाने अनुभवले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना मदत केली आहे. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. तसेच हिंदू, मुस्लीम आणि भारतातील प्रत्येक नागरिक जाणतो की पाकिस्तान आपला शत्रू आहे असेही आव्हाड म्हणाले.
#WATCH | Nashik, Maharashtra: On the India vs Pakistan match today in the Asia Cup 2025, NCP-SCP leader Jitendra Awhad says, “Pakistan has always helped the terrorists. Pakistan is a terrorist country. Hindus, Muslims and every citizen of India know that Pakistan is our enemy.” pic.twitter.com/bbBIOhc1ru
— ANI (@ANI) September 14, 2025