Jammu Kashmir – पूंछमध्ये तीन दहशतवादी समर्थकांना अटक, घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि युद्ध साहित्य जप्त

जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात रविवारी दहशतवादी मॉड्युल उद्धवस्त केलं. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंधित तिघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन एके-47 रायफल्स जप्त केल्या आहेत. यापूर्वी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्याच मॉड्यूलशी संबंधित 4 रायफल्स आणि दारूगोळा जप्त केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू पोलीस दहशतवाद्यांच्या साथीदारांविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहेत. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या अनेक लोकांना पकडण्यात आले आहे, असे जम्मू झोनच्या आयजीपींनी सांगितले.