
ग्रेटर नोएडामध्ये इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून उडी मारल्याने 37 वर्षीय महिला साक्षी चावला आणि त्यांचा दिव्यांग मुलगा 11 वर्षीय दक्ष यांचा मृत्यू झाला. ग्रेटर नोएडामधील एस सिटी सोसायटीत ही घटना घडली. 13 व्या मजल्यावरून पडल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज ऐकल्यानंतर रहिवाशांनी काय झाले, हे पाहण्यासाठी धाव घेतली असता साक्षी आणि दक्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घराच्या आतमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. आमच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही, असे त्यात लिहिले आहे.