पाकशी खेळण्याचा निर्णय सरकारचा

’पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. बीसीसीआय आणि क्रिकेटपटूंना तो निर्णय मान्य करावा लागणार आहे,’ हे वास्तव माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आज मांडले.

ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांबद्दल काही लोक बीसीसीआयला दोष देत आहेत. सरकारचा याच्याशी संबंधच नसल्याचे भासवले जात आहे. मात्र, गावसकर यांच्या वक्तव्यामुळे सत्य समोर आले आहे. ‘बहुराष्ट्रीय सामने असल्यास पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे हे सरकारने ठरवून टाकले आहे. त्यामुळे त्यावर बोलून उपयोग नाही.