
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार तूर्त गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार आचार्य देवव्रत सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असून उद्या राजभवनात त्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी रविवारी दुपारी देवव्रत मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी दर्शना देवी यासुद्धा होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मुंबईत स्वागत केले.
पोलिसांकडून मानवंदना
आचार्य देवव्रत यांचे मुंबई सेंट्रल स्थानकात आगमन होताच मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली, तर त्यानंतर देवव्रत राजभवन येथे पोहचल्यानंतरही पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.