आता नॅशनल पार्कमध्ये नवा कबुतरखाना, नवा वाद पेटण्याची शक्यता

मुंबईत माहीम दादरसह इतर अनेक ठिकाणी कबुतरखान्यावरून वाद पेटलेला असतानाच आज बोरिवलीत नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. नॅशनल पार्क येथील जागेत हा कबुतरखाना बांधण्यात आला आहे.

मुंबईतील कबुतरखान्याच्या प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी राजकीय वाद पेटला होता. हा वाद कोर्टात गेला. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला टाकण्यास कोर्टाने बंदी केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारतर्फे समितीची घोषणा करण्यात आली होती. कबुतरखान्या प्रश्नावर वाद सुरू झाल्यानंतर नॅशनल पार्कसारख्या ठिकाणी कबुतरखाना हलविण्यात यावा, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. अखेर आज जैन समाजाच्या मदतीने या ठिकाणी नव्या कबुतरखान्याची निर्मिती करण्यात आली. कबुतर खाण्याचे उद्घाटन करण्यात आले. या कबुतरखान्याचा त्रास कोणाला होणार नाही, असा दावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य म्हणजे, स्थानिक रहिवाशांचे हित जपून प्रत्येक वॉर्डात नवे कबुतरखाने सुरू करू असेही ते म्हणाले.