
मुसळधार पाऊस आणि रखरखत्या उन्हामुळे खालापुरातील भारशेतीचा अक्षरशः वांदा केला आहे. बदलत्या वातावरणाचा फटका या पिकाला बसला असून करप्या रोगाने हल्ला केल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी कर्ज काढून भातपिकाची लागवड केल्याने हे पीक वाया गेले तर काय कराचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
खालापूर तालुक्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने लागवडीत अनेक अडचणी आल्या तरीदेखील शेतकऱ्यांनी भात पिकांची लागवड केली. चौक परिसर, केलवली, बीड-खुर्द, खानाव, डोनवत, माडप, माजगाव आदी गावांमध्ये भातशेती केली जाते. अंदाजे दोन हजार सातशे हेक्टवर भात ल विण्यात आला आहे. त्यासाठी ल ाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र आता करप्या रोगामुळे पिकाची मुळे सडून जाण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
यावर्षी पाऊस मे महिन्यापासून चालू झाला होता. त्यामुळे भात रोपे लावण्यात अडचणी आल्या होत्या. तर आता भात पीक बहरत असताना पिकावर करप्याने हल्ला केल्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. करप्या रोग आटोक्यात न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
– प्रसाद पाटील, शेतकरी.