
देवाभाऊ, शेजारी बघा, काय चालले आहे? असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारत शेतकऱ्यांच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. नेपाळमध्येही राज्यकर्त्यांची अशीच लूट केली, त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. नेपाळचे उदाहरण देत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेधले आहे. नेपाळचे उदाहरण दिले तर आम्हाला माओवादी ठरवण्यात येते. मात्र, या घटनेकडे देशाने गांभीर्याने लक्ष देत धडा घेण्याची गरज आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. शरद पवार यांनी योग्य उदाहरण दिले असून त्यासाठी त्यांनाही माओवादी नक्षलवादी ठरवणार का, असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी केला.
शरद पवार यांनी नेपाळचे उदाहरण दिले, ते योग्यच आहे. आता नेपाळचे उदाहरण दिले तर आम्हाला माओवादी ठरवत आहेत. मात्र, आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही महाराष्ट्र हितासाठी नेहमी बोलत राहणार. आम्ही हे उदाहरण दिले तर आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. मात्र, शरद पवार यांनी योग्य विचार मांडला आहे. देशाच्या आजूबाजूला शेजरी देशात काय होत आहे, याकडे लक्ष देण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यांनी योग्य विचार मांडला आहे, आता शरद पवार यांनाही माओवादी, नक्षलवादी ठरवणार का, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र लूटला जात असेल, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची लूट होणार असेल, आता लुटाटलाही सरकारी तिजोरी शिल्लक नाही. राज्य चालवण्यासाठी कर्ज काढले जात आहे. त्याचीही लूट होत आहे. असे असूनही राज्य प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येते. राज्यात गुंतवणूक येते, असे सांगितले जात आहे, कुठे आहे ती गुंतवणूक, असा सवालही त्यांनी केला.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवसही कर्ज काढून साजरा करण्यात येत आहे, त्यासाठी विविध सरकारी जोयना राबवण्यात येत आहे. याची काय गरज आहे. नरेंद्र मोदी अत्यंत साधे आहे. माग राज्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात एवढा पैसा खर्च करण्याची काय गरज आहे. जनतेला हवे तर जनताच मोदी यांचा वाढिदवस साजरा करेल. पंडित नेहरू, महात्मा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनताच साजरी करते. मग मोदींचा वाढदिवस सरकारी खर्चातून का करण्यात येत आहे. मोदी यांनी हे थांबवले पाहिजे. राज्य कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणे हा आर्थिक अपराध आहे, असेही ते म्हणाले.
मोदी हे लोकनेते नाहीत, सुरुवातीला मोदी काही करतील, या अपेक्षेने जनतेने त्यांना निवडून दिले. त्यानंतर मतचोरी करत भ्रष्ट मार्गाने ते निवडून आले. ते जनतेने निवडलले नेते नाहीत. मोदी या भाजपच्या आयटी सेलने फुगवलेला फुगा आहे. त्यामुळे मोदी यांनी केलेली घोषणा आता जनताही गांभीर्याने घेत नाही. ते चीनला धडा शिकरणार होते, त्याचे काय झाले, ट्रम्प दररोज दम देत आहेत. तरीही मोदी काही बोलत नाही. असा दुर्बळ पंतप्रधान देशाला लाभला हे देशाचे दुर्दैव आहे. पहलगाम हल्ल्यात 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले आणि पंतप्रधान देशाच्या क्रिकेट संघाला पाकिस्तानशी क्रिकेट खेळायला लावत आहेत, अशा पंतप्रधानाबाबत आपल्याला आस्था का असावी. भाजपचा हा व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे, त्याचे सीईओ मोदी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.