
इस्रायली सैन्याने गाझा शहरात जमीनी हल्ले सुरू केले असून, या कारवाईत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनने दोन इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मंगळवारी सकाळी याबाबत वृत्त दिले. इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ३.२ लाख लोकांनी शहर सोडले आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, ओलिसांच्या सुटकेसाठी आणि हमासच्या पराभवासाठी सैन्य धैर्याने लढत आहे. काट्झ म्हणाले की, गाझा जळत आहे, सैन्य दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर पूर्ण ताकदीने हल्ला करत आहे. ध्येय पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि थांबणारही नाही.
दरम्यान, इस्रायलने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये गाझा शहर ताब्यात घेण्याच्या योजनेला मान्यता दिली. याअंतर्गत, सुमारे ६० हजार राखीव सैनिकांना ड्युटीवर बोलावण्याचा आदेश देण्यात आले. याच मोहिमेची सुरुवात करत इस्रायलने गाझावर हल्ले सुरु केले आहेत.