आनंदकुमारला ऐतिहासिक सुवर्णपदक

हिंदुस्थानच्या आनंदकुमार वेलकुमारने स्केटिंगमध्ये नवा इतिहास घडवला आहे. चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 22 वर्षीय आनंदकुमारने सुवर्णपदक काबीज केले. स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सोनरी कामगिरी करणारा तो पहिलाच हिंदुस्थानी खेळाडू ठरला, हे विशेष.

पुरुषांच्या 1000 मीटर स्प्रिंट इव्हेंटमध्ये आनंदकुमारने 1 मिनिट 24.924 सेकंद वेळेत पहिला क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आनंदकुमार वेलकुमार हा तामीळनाडूतील स्पीड स्केटर आहे. सध्या ते चेन्नईच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गिंडी येथे संगणक विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत.

2021 मधील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आंनदकुमाने रौप्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर टीम रिले प्रकारात त्यांनी कांस्यपदक मिळवले.