सी-लिंकवरून उडी मारून केली आत्महत्या

इमिटेशन ज्वेलर्स व्यावसायिकाने वांद्रे वरळी सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. अमित चोप्रा असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. चोप्राच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

आज सकाळी काही स्थानिक मच्छीमारांना समुद्रात मृतदेह तरंगत असल्याचे दिसला. याची माहिती पोलिसाना देण्यात आली. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. चोप्रा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून ते अंधेरी येथे राहत होते. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. चोप्रा हे नेहमी रात्री बाहेर जात असायचे. रात्री पुन्हा ते घरी येत असायचे. मंगळवारी रात्री चोप्रा हे बाहेर पडले. त्याने अंधेरी येथून एक टॅक्सी पकडली. टॅक्सी सी लिंकवर आली. तेव्हा व्यावसायिकाने टॅक्सी थांबवण्यास सांगितली. चालकाने टॅक्सी थांबवली. त्यानंतर व्यावसायिकाने सी लिंकवरून समुद्रात उडी मारली.