निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचाही समावेश आहे. याशिवाय, ३५९ इतर पक्षांविरुद्धही डीलिस्टिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. ही कारवाई प्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत घेतली गेली असून, सक्रिय नसलेल्या किंवा एकही निवडणूक लढवले हे पक्ष आहेत. तसेच या पक्षांचे कार्यालयेही सापडत नाहीत. त्यामुळे ही कारवाई केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

या कारवाईबद्दल माहिती देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, ज्या पक्षांनी सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग घेतला नाही, त्यांना डीलिस्ट केले आहे. हा निर्णय १८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आला. यापूर्वी, पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट २०२५ रोजी ३३४ पक्षांना डीलिस्ट करण्यात आले होते. अशा प्रकारे, गेल्या दोन महिन्यांत एकूण ८०८ पक्षांची नोंद रद्द करण्यात आली आहे.