
>> भगवान परळीकर
काँगेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घ काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कामगिरी बजावली. लोकाभिमुख कार्यपद्धती व महिलांच्या प्रश्नावर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांचा जनसामान्यांत प्रभाव होता. माजी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या निर्मलाताई शंकरराव ठोकळ या ज्येष्ठ स्कातंत्र्यसैनिक आणि खासदार स्वर्गीय तुळशीदास जाधव यांच्या कन्या होत. निर्मलाताई ठोकळ यांचे उच्च शिक्षण विवाहानंतर सोलापूरच्या दयानंद
कॉलेजमध्ये झाले. त्यांनी मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली आहे. सार्वजनिक जीवनात निर्मलाताईंचा प्रवेश नगरपालिका व महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी म्हणून झाला. त्या वेळेस स्त्रीयांसाठी राखीव जागा नव्हत्या. सर्वसाधारण जागेकर त्यांनी निवडणूक लढवली होती. सोलापूर महानगरपालिकेत दोन वेळा त्या नगरसेवक होत्या. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर शहर दक्षिण मतदार संघामधून निर्मलाताई काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यांनी या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वि.रा. पाटील यांचा पराभव केल्यामुळे त्यांचे नाक राज्यभर चर्चेत आले. निर्मलाताई पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या. तेव्ही सर्व स्तरावरच्या राजकारणातील स्त्रीयांचा सहभाग फारच कमी होता. सोलापूर जिल्हय़ातून अक्कलकोटच्या निर्मलाराजे भोसले, बार्शीच्या प्रभाताई झाडबुके, शैलजा शितोळे, निर्मलाताई ठोकळ आणि पार्वती मलगोंडा या महिला आमदार झाल्या. निर्मलाताई ठोकळ यांनी राजकारणातील अनेक स्थित्यंतरे, अनुभवली आणि कठीण प्रसंगांवर मातही केली. निर्भिड स्वभावामुळे त्यांना अनेक वेळा संघर्ष करावा लागला. स्पष्ट विचाराच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्या जवळपास अर्धे शतकहून अधिक सोलापूरच्या सार्वजनिक जीवनात वावरल्या. परंतु सोलापूरच्या महापौर होऊ शकल्या नाहीत. विधान परिषदेच्या आश्कासन समितीचे प्रमुख म्हणून तसेच पंचायतराज व अन्य समित्यांवरदेखील त्यांनी काम केले. त्यांनी सोलापूरच्या बाल न्यायालयाच्या ऑनररी मॅजिस्ट्रेटपदी 12 वर्षे काम केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांची अभ्यासू कृत्ती आणि नेतृत्क गुण यांचा जनतेला प्रत्यय आला. लोकमानसात त्यांची स्कतंत्र प्रतिमा निर्माण झाली. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले असताना राज्यपाल कोटय़ातून निर्मलाताई महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य बनल्या. त्यानंतर विधान परिषदेतून त्यांची कोल्हापूरच्या शिकाजी विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाली. अल्पावधीतच त्या सिनेटमधून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यकारणीवर निवडून आल्या. त्या वेळी शिनाजी निद्यापीठातील वातावरण फारच गढूळ झाले होते. विद्यापीठाच्या तत्कालीन कुलसचिव डॉ. उषा इथापे यांच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने उग्र आंदोलन छेडले होते. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आणि विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळात विशेषतः कार्यकारिणीत गट-तट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत निर्मलाताईंनी विद्यापीठ कार्यकारिणीतील निपक्षपातीपणे काम केले. समोर येणाऱया प्रत्येक बाबीचा सांगोपांग सारासार विचार करून कार्यकरणीच्या बैठकीत त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांना निर्मलाताईंचा मोठा आधार वाटत होता. सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. स्वर्गीय तुळशीदास जाधव सार्वजनिक वाचनालयाच्या त्या संस्थापक होत्या. ‘महिला प्रबोधिनी’ या मासिकाच्या संस्थापक संपादक म्हणून त्या कार्यरत होत्या. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सोलापूर येथे झालेल्या 79व्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या कार्याध्यक्ष होत्या. सोलापुरातील प्रस्थापितांचा विरोध झुकारून त्यांनी 2006 साली झालेले 79व्या साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्व. मारुती चित्तमपल्ली हे होते. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन साहित्य संमेलनाला येण्याचा आग्रह केला होता. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. निर्मलाताईंच्या निधनामुळे सोलापूर जिह्यातील एक सुजाण महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.