
सातारा जिह्यातील कास पठारावरील बहरलेली विविध जातीची फुले पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहेत. कास पठार पर्यटकांनी बहरून गेले आहे. दूरवरून लोक कासचे सौंदर्य पहाण्यासाठी येत आहेत. एक आजी-आजोबादेखील हे मनमोहक निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी बनवलेला एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओत आजोबा शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीसाठी कॅमेऱ्यामध्ये बघून छान गाणे गाताना दिसत आहेत. ‘तुझी चाल तुरू तुरू उडते केस भुरू भुरू’ असे गाणे आजोबा गात आहेत. 60-65 पार केलेल्या आजोबांचा आवाजही त्यांच्या मनाइतकाच तरुण आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला. नेटकरीही त्यांचे खूप करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @banpurikarmama या अकाऊंटवर शेअर केला असून या व्हिडीओवर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ह्यूज तर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.