घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी… हे करून पहा

काही लोकांच्या घामाच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. आपल्या शरीराच्या घामाच्या दुर्गंधीमुळे अन्य कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. घामाची दुर्गंधी येऊ नये. सर्वात आधी दररोज नियमित अंघोळ करा. जास्त घाम आला असेल तर लगेच कपडे बदला.

नेहमी स्वच्छ कपडे आणि सुती कपडे वापरा. त्यामुळे हवा खेळती राहते व शरीराला जास्त घाम येत नाही. त्यामुळे दुर्गंधी कमी होते. मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. यामुळे घामाच्या वासावर परिणाम करू शकतात. जर जास्तच घाम येऊन दुर्गंधी येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.