कबुतरांना दाणे देणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंद

n बंदी असतानाही कबुतरांना दाणे टाकत असल्याने वांद्रे पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक वांद्रे तलाव परिसरात गस्त घालत असताना तीन जण हे कबुतरांना खाद्य पदार्थ देत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्या तिघांची चौकशी सुरू असतानाच मोटरसायकलवरून एक महिला तेथे आली. तिनेदेखील कबुतरांना खाद्यपदार्थ टाकले. वांद्रे पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला.