
गेल्या २० वर्षात एनडीए सरकारने बिहारला लुटले आणि अजूनही लुटत आहेत, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात शनिवारी तेजस्वी यादव यांच्या अधिकार यात्रेचा समारोप झाला. यावेळी एका मोठ्या जनसभेला संबोधित करताना त्यांनी सध्याच्या सरकारवर तीव्र हल्ला चढवला आणि यावेळी महाआघाडीच्या नेतृत्वाखालील चांगले सरकार येईल, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, “गेल्या २० वर्षात एनडीएने लोकांसाठी काय केले आहे? त्यांनी बिहारला लुटले आहे आणि अजूनही लुटत आहेत. त्यांनी प्रशासनाचा वापर करून विरोधकांना त्रास दिला आहे, अनेक अधिकाऱ्यांच्या घरात पैसे सापडत आहेत. बिहारच्या लोकांना सर्व काही माहित आहे.”
ते पुढे म्हणाले, “बिहारमधील लोकांना शिक्षण, कारखाने आणि काम करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांना बिहारमध्ये गुंतवणूक हवी आहे, कारखाने सुरू व्हावेत, रोजगार उपलब्ध व्हावा आणि स्थलांतरापासून मुक्तता हवी आहे. या सरकारने लोकांना काय दिले आहे? लोकांना त्यांच्या घरात गोळ्या घातल्या जात आहेत. भ्रष्टाचार्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना संरक्षण देत आहे.”