
अमान्यता प्राप्त 474 राजकीय पक्षांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. यात महाराष्ट्रातील 44 पक्ष आहेत. यांची नावे आयोगाने यादीतून काढून टाकली आहेत. अजून 359 पक्षांवर अशाच प्रकारची कारवाई केली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आयोगाने ही कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशला बसला आहे. तेथील 121 पक्षांची यादीतून हक्कालपट्टी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यानंतर तामिळनाडूतील 42, दिल्लीतील 40, मध्य प्रदेशमधील 23, पंजाबमधील 21, राजस्थान व हरियाणातील 17 व बिहारमधील 15 पक्षांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
निवडणूक खर्चाचे अहवाल भोवले
देशभरातील 359 पक्षांना आयोग नोटीस पाठवणार आहे. या पक्षांनी तीन वर्षांचा आर्थिक अहवाल व निवडणूक खर्च वेळेत सादर केलेला नाही. त्यामुळे या पक्षांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.