देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडताहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्याची स्कप्ने पडत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले आहेत. फडणवीस यांना रेशीमबागेतून तसे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापमध्ये सपकाळ यांनी हा दावा केला. सपकाळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांची प्रतिमा चांगली होती. मात्र, सध्या ते कोणाचेच ऐकून घेत नाहीत. आता त्यांना त्यांची जुनी प्रतिमा उपयोगी ठरत आहे. मी महाराष्ट्रात हिंदी भाषा लागू करून दाखवली हे त्यांना हिंदी भाषिक प्रांतांना दाखवून द्यायचे आहे. यातून त्यांना आपली स्वीकार्यता वाढवून घ्यायची आहे. हे सर्क पाहता त्यांना रात्रीच नाही तर दिवसाही पंतप्रधान होण्याची स्कप्ने पडत असल्याचे दिसते, असे सपकाळ म्हणाले.

हिटलर हाच आरएसएसचा आदर्श

आरएसएसचा आदर्श हिटलर आहे. समता नाकारणारी मनुस्मृती त्यांना महत्त्वाची वाटते. सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगून ते राजकारणही करतात. त्यांनी स्वीकारलेल्या मनुवादी विचारधारेविरोधात गौतम बुद्ध, भगवान महावीर व संत चोखामेळा, संत तुकाराम यांनी विद्रोह केला. सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण, दगड फेकणारे पारशी, मुस्लिम किंवा ख्रिश्चन नव्हते तर ते मनुवादीच होते. काँग्रेसने या विचारधारेला नेहमी विरोध केला आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.